Melghat Updates!
डॉ. भालेराव (ENT Specialist Chichwad, Pune) व त्यांच्या गटाने दिनांक २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान मेळघाटला भेट दिली. तेथे “मैत्री” ने आरोग्य शिबिर आयोजित केले होते. ३ दिवसांच्या तपासणी शिबिरास अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. २० गावांमध्य एकुन ५२३ रूगण तपासले. या मधे काही रुग्ण खरुजचे होते. त्यातले काही आजार औषधाने बरे होणारे आहेत. काही रुगणांना शस्त्रक्रीया करावी लागणार आहे. याविषयीचा सविस्तर अहवाल डॉ. भालेराव यांचा गट “मैत्री” ला लवकरच देणार आहेत.
"मैत्री" च्या मेळघाटातील चिलाटी येथील प्रशिक्षिण केंद्रात दर शनिवारी दुपारी ४ ते ७.४५ एक साप्ताहीक बैठक घेतली जाते. यात एक विषय घेऊन, त्यावर सविस्तर चर्चा होते.

श्री. आनंद कोठडिया (कृषीरत्न - करमाळा जि. सोलापूर) यांचा वाढदिवस दि. ५ मार्च रोजी असतो. वाढदिवसानिमित्त खूप मोठा कार्यक्रम न करता, "मैत्री" च्या चिलाटी येथील केंद्राला भेट देवून तेथील कार्यकर्त्यांशी आणि तिथल्या तरूणांशी बोलावे असे कोठडियांनी ठरवले.

त्यामुळे शनिवार दिनांक ०५ मार्च २०१६ हा चिलाटीतील लोकांसाठी एक विशेष बैठक ठरली.श्री. आनंद कोठडीया यांच्यासोबत श्री. सुनिल पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती), श्री. विलास शिंदे (सह्याद्री कृषी फार्म नाशिक व त्यांचे मित्र), २० गावांतील नागरिक व पंचायत समितीचे अधिकारी तसेच ‘मेळघाट मित्र’ चे आजी-माजी कार्यकर्ते अशी एकूण १०० च्या आसपास लोकांची उपस्थिती होती. बैठकीला १० वाजता सुरुवात झाली. “मैत्री” च्या कामाची रामेश्वर फड व आनंद कोठाडीयांनी ओळख करुन दिली. त्यानंतर सुनिल पाटील यांनी सर्व लोकांना त्यांच्या अडचणी विचारल्या. सर्वांनी मोकळेपणाने प्रश्न मांडले. त्यावर चर्चा झाली. श्री. सुनिल पाटील यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. काही विषयांची माहिती घेवून गटविकास अधिका-यांना माहिती देण्यास सांगितले. वादळी चर्चा झाली. यापुढे असेच भेटत राहु असे सांगितले. सर्वांना त्यानी आपला फोन नंबर दिला. कधीही फोन करायला सांगितले. १ वा बैठक संपली. त्या नंतर आनंद कोठाडीया यांनी लोकांना व कार्यकर्त्यांना माहिती दिली. तसेच त्यांच्या सोबत आलेले- अभंग साहेबांनी शेतीविषयी थोडक्यात माहिती दिली. दुपारी ४वा. विलास शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री कृषी फार्म विषयी माहिती दिली. रात्री चिलाटीतील लोकांनी अदिवासी नृत्याचा कार्यक्रम केला.
मेळघाट: क्षण समाधानाचा

३१ जानेवारीचा दिवस विशेष आहे आपल्या सगळ्यांसाठी... त्या दिवशी चिंचवडला एक मॅरेथॉन पळण्याची स्पर्धा आहे. त्यात विशेष नाही कारण ठिकठिकाणी अशा स्पर्धा होत असतातच, पण विशेष हे आहे की त्या दिवशी मेळघाटमधील ६ मुलं आणि ४ मुली त्या स्पर्धेत पळणार आहेत आणि महत्वाचं असं की ज्या वर्षी मेळघाटमध्ये कुपोषण आणि बालमृत्यूंचा कहर झाला होता त्याच सुमारास जन्माला आलेली ही सगळी मुलं आहेत.. आपल्या मेळघाटमधील कामाचा हा एक टप्पा आहे. समाधानाचा क्षण आहे...

२१ तारखेलाच ही मुलं चिंचवड येथे आली आहेत. त्यांचा सरावही सुरू झाला आहे…

३१ जानेवारी २०१६ या दिवशी, सकाळी ६.१५ वाजता भक्तीशक्ती चौक, निगडी येथून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे.

यामुलांना प्रोत्साहित करायला अवश्य या…
 
 
dhadak mohim
    leh cloudburst
        melghat
      radditun saddi
projects
emergency work